तालुका

जय हनुमान मित्र मंडळ वेरखोले मध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची मिरवणूक संपूर्ण गावामधून काढण्यात आली


नितेश पवार – ग्रामीण प्रतिनिधी बिरवाडी

महाराष्ट्रात शिवजयंती कधी साजरी करायची याबाबत शिवप्रेमींमध्ये दोन गट आहेत. काही जण तारखेनुसार तर काही जण तिथीनुसार शिव जयंती साजरी करतात.
19 फेब्रुवारी दिवशी श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार साजरी केली जाते व दुसरी शिवजयंती ही तिथीनुसार साजरी केली जाते. तिथीनुसार शिवभक्त फाल्गुन वद्य तृतीया दिवशी साजरी करतात. यंदा फाल्गुन वद्य तृतीया ही 21 मार्च 2022 दिवशी आहे. त्यामुळे काही शिवभक्त या दिवशी देखील शिव जयंती साजरी करतात.

महाराष्ट्रात अनेक मराठी सण परंपरेनुसार तिथीवर साजरी करण्याची पद्धत आहे त्यानुसार शिवजयंती देखील तिथी वर देखील तितक्याच उत्साहात साजरी केली जाते.

जय हनुमान मित्र मंडळ वेरखोले बिरवाडी मध्ये ढोल ताशे आणि तुतारी वादनाने भारावलेले वातावरण, ठिकठिकाणी सादर होणाऱ्या पोवाड्यांमधून उलगडणारी शिवाजी महाराजांची शौर्यगाथा अन भगवे ध्वज हातात घेऊन उत्साहात सहभागी झालेले आबालवृद्ध…… छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, प्रेम आणि अभिमान व्यक्त करण्यासाठी शिवप्रेमींनी विविध कार्यक्रमांतून सोमवारी श्री. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांनी मिरवणुका काढून, सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करून, शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यात आली.

या वेळी जय हनुमान मित्र मंडळ वेरखोले अध्यक्ष विनायक सावंत, उपाध्यक्ष अनंत पवार, शिवाजी तांबे, मनोहर पवार, संतोष पवार, शिवाजी मोरे, वसंत तांबे, रमेश पवार, मनोहर सपकाल, गेनू पवार, ग्रामपंचायत सदस्य जयेश पार्टे, रघुनाथ भोसले, सखाराम तांबे, बाबू मोरे, अनंत खामकर, महादेव पवार इतर सदस्य तसेच महिला मंडळ मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!