तालुका

महाड नाते कुंभार कोंड येथे श्री जय हनुमान जयंती उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा

अभिजीत ढाणिपकर - शहर प्रतिनिधी महाड

 

महाड तालुक्यातील नाते कुंभार कोंड येथे ७ वर्षांपासून श्री जय हनुमान जयंती उत्सव व अखंड हरिनाम सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या वर्षीही मोठ्या उत्साहात सप्ताह साजरा करण्यात आला.

चैत्र महिन्यातील पौर्णिमेला हनुमान जयंती साजरी केली जाते, या दिवशी भक्त उपवास ठेवतात आणि पूर्ण भक्तिभावाने हनुमंताची पूजा करतात, यावेळी हनुमान जयंती शनिवारी येत आहे, अशा स्थितीत त्याचे महत्त्व आणखी वाढले आहे, कारण मंगळवार आणि शनिवार हनुमंताला समर्पित मानले जातात.

मौजे वरचे नाते कुंभार कोंड येथे स्वानंद सुख निवासी तपोनिधी श्री. गणेशनाथ महाराज व सद्गुरू तपोनिधी श्री. अरविंदनाथ महाराजयांच्या कृपा शिर्वादाने चैत्र शुद्ध१४ शुक्रवार दिनांक १५ एप्रिल २०२२ ते शनिवार दिनांक १६ एप्रिल २०२२ रोजी श्री जय हनुमान जयंतीउत्सव व अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला.

श्री जय हनुमान जयंती उत्सव व अखंड हरिनाम सप्ताहची कार्यक्रम रूपरेषा खालील प्रमाणे आयोजित करण्यात आली होती, शुक्रवारदि. १५ एप्रिल २०२२ या दिवशी ध्वजारोहण :- ह.भ.प. रामचंद्र नातेकर, श्रींची पूजा :- ह.भ.प.किसन मोरे, विणा पुजन : ह.भ.प. नथुराम नातेकर, घटस्थापना :- ह.भ.प.मंगेश चव्हाण व ह.भ.प. मंगेश नातेकर, कळसपुजन :- ह.भ.प. मनोहर नातेकर, टाळ मृदुंग पुजन :- ह.भ.प. रवि नातेकर व ह.भ.प. अमित कुमटेकर, भजन :- ग्रामस्थ मंडळ नाते कुंभार कोंड, प्रवचन :- गुरुदेव अरविंदनाथ महाराज, ह.भ.प. दशरथ ढाणिपकर यांस कडून दुपारची पंगत भोजन, प्रवचन :- ह.भ.प.श्री. सुभाष महाराज तुडीळकर, हरिपाठ :- महिला मंडळनाते कुंभार कोंड, श्री. गोपाल नातेकर यांस कडून सायंकाळची पंगत भोजन, किर्तन :- ह.भ.प.सौ. नंदाताई नामदेव मेस्त्री(सुतार) मु.पो. कोंडवी पोलादपुर, वादक : प्रणीत नामदेव मेस्त्री, मृदंगमणी : प्रशांत नामदेव मेस्त्री, हरिजागर :- जय हनुमान तरुण मंडळ व ग्रामस्थ नाते कुंभार कोंड, त्या नंतर दुसर्या दिवशी शनिवार दि. १६ एप्रिल २०२२ रोजी पहाटे श्री हनुमान जन्मोत्सव व ग्रामस्थ मंडळ भजन, कीर्तनकार:- ह.भ.प.सुरेश हरी मोरे मु.पो. काटेतळी पोलादपुर, गवई: तुकाराम शिंदे व सुरेश जाधव, मृदंगमणी : संतोष मोरे, त्या नंतर दुपारी ग्रामस्थ मंडळ नाते यांस कडून महाप्रसाद कार्यक्रम व सायंकाळी श्री. हनुमानाची सवाद्य पालखी परिक्रमा संपूर्ण गावातून टाळ मृदुंग च्या गजरात काढण्यात आली, मंगळ महाडकर यांस कडून सायंकाळची पंगत भोजन, त्यानंतर ग्रामस्थ मंडळ नाते कुंभार कोंड यांच्या भजनाने कार्यक्रम सांगता झाली.

यावेळी सप्ताहाला गुरुदेव अरविंदनाथ महाराज, ह.भ.प. सुभाष महाराज तुडीळकर, ह.भ.प. नंदाताई नामदेव मेस्त्री(सुतार) मु.पो. कोंडवी पोलादपुर, ह.भ.प. सुरेश हरी मोरे मु.पो. काटेतळी पोलादपुर, चैताली खोपडे नाते ग्रामपंचायत उपसरपंच, अश्विनी ढाणिपकर नाते ग्रामपंचायत सदस्य, जय हनुमान तरुण मंडळ व ग्रामस्थ मंडळ नाते कुंभार कोंड, महिला मंडळ नाते कुंभार कोंड इत्यादी ची उपस्थिती होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!