महाराष्ट्र

परभणी येथे जलसंपदा विभागाची आढावा बैठक संपन्न

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक पार पडली

मितेश महाले – सहसंपादक

आज परभणी येथे जलसंपदा विभागाची आढावा बैठक राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पारपडली.

यावेळी खासदार फौजिया खान, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वडपूरकर, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार राहुल पाटील, जिल्हाधिकारी व जलसंपदा विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. अनेक प्रकल्पांची दुरुस्ती, कालव्यांची दुरुस्ती व इतर प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली. लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्याच्या सूचना जयंत पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!