तालुका
शिक्षक रत्न पुरस्कृत स्वर्गिय मोहन पाटील यांना परिवार आणि शिक्षकवृंद यांच्या मार्फत भावपूर्ण आदरांजली
स्वप्नील ढवण – उपसंपादक महाराष्ट्र राज्य
कै. मोहन शिवराम पाटील, राहणार हेमनगर (पोयनाड), अलिबाग त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1951 आणि मृत्यु 4 मे 2021, शिक्षक रत्न पुरस्कृत स्वर्गिय मोहन शिवराम पाटील यांना संपूर्ण परिवार आणि समस्त शिक्षकवृंद यांसकडून भावपूर्ण अदरांजली देण्यात आली.
स्वर्गिय मोहन शिवराम पाटील यांनी शैक्षणिक, सामाजिक अशा अनेक क्षेत्रात आपले योगदान दिले होते, शाळा हे मंदिर व विद्यार्थी त्यातील देव मानून संपूर्ण आयुष्य झोकून दिले होते, आज त्यांचे विद्यार्थी डॉक्टर, वकिल, बिझनेसमॅन, शिक्षक इत्यादी क्षेत्रात कार्यरत आहेत, त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उपशिक्षक ते पदविधर शिक्षक, पदोन्नती मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहिले होते, तसेच कला क्षेत्रात त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती.



