तालुका

रोहा शहराच्या मुख्य कमानीवरील सामाजिक संस्थाच्या फोटोमुळे रोहा नगरपालिकेने बॅनर हटवला

सोहम जाधव – शहर प्रतिनिधी रोहा

रोहा तालुक्यात काही दिवसांपासून बॅनरमुळे खुपच गदारोळ निर्माण झाल्याच चित्र दिसत आहे, रोहा शहरातील मुख्य कमानिवर काही संस्थेनी डॉ. सी. डी.  देशमुख यांचा बॅनर लावला, सदर बॅनर हे नगरपालिकाने 24 तासाच्या आत काडून टाकले, नगरपालिके जाणून बुजून  डॉ. सी. डी.  देशमुख यांचा बॅनर काढला असा काही संस्थेनि आरोप केला आहे.

या बाबत नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दयानंद गोरे यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले कि काही संस्थेनी सदर बॅनर वरती डॉ. सी. डी. देशमुख यांचा बॅनर लावला हे कृत्य खरंच कौतुकास्पद आहे, परंतु सदर बॅनर ही रोहा शहराच्या मुख्य कमानीवरती होता आणि त्यावर काही संस्थाचा फोटो लावल्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ शकतो त्यामुळे ही बॅनर नगरपालिकेने काढला, डॉ. सी. डी. देशमुख यांचा बॅनर लावल्यामुळे नगरपालिकेने बॅनर काढला असा काही संस्थानि आरोप लावला आहे, परंतु हे पूर्णपणे चुकीचं आहे, तसेच सदर बॅनर ही नगरपालिकेने फाडली नव्हती तर तो बॅनर काडून फक्त डॉ. सी. डी. देशमुख यांचा फोटो असलेला बॅनर नगरपालिके कडून लावण्यात आला असे सुद्धा मत व्यक्त केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!