वडगाव ग्रामपंचायतीमध्ये कोट्यावधी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा
अभिजीत ढाणीपकर – शहर प्रतिनिधी महाड
माणगाव तालुका गोरेगाव विभागातील मौजे वडगाव येथे ग्रामपंचायत इमारत, अंगणवाडी, व्यायाम शाळा इमारत उद्घाटन आणिसामाजिक सभागृह भूमिपूजन, स्मशानभूमी रस्ता भूमिपूजन, बौद्धवाडी स्मशानभूमी रस्ता भूमिपूजन, पाणी पाईपलाईन दुरुस्ती, हनुमान मंदिर रस्ता भूमिपूजन इत्यादी विविध विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा दि. 27 रोजी विभागातील पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषमय वातावरणात संपन्न झाला.

यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की तुम्ही जे जे विकासकामे सांगाताय ती आम्ही करत आहोत, तुम्ही फक्त पाच वर्षातून एकदा आम्हाला एक मत द्यायचे आहे, बाकी पाच वर्ष आम्ही तुमचे बांधील असणार आहोत, आतापर्यंत या विभागात जी कामे झालीआहेत ती फक्त शिवसेनाच्या माध्यमातून आणि शिवसैनिकानी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे झाली आहेत, आम्ही खोटीआश्वासने देत नाही तर आश्वासन पूर्ती करतो असे पुढे उपस्थितांना सांगितले.
जाहिरात
या वेळी माजी जिल्हाप्रमुख प्रमोद शेठ घोसाळकर, जिल्हा परिषद सदस्य अमृता हरवडकर, पंचायत समिती उपसभापती सुजित शिंदे, तालुका प्रमुख गजानन अधिकारी, विभाग प्रमुख जगदीश भोकरे, उपविभाग प्रमुख मंगेश कदम, विभाग प्रमुख मधुकर नाडकर, वडगावसरपंच जनार्धन गावडे, विद्यमान सरपंच शिवाजी गावडे, उपसरपंच पानवकर आणि विभागातील शिवसेना युवा सेनेचे आजी–माजीपदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



