महाशिवरात्रि उत्सवानिमित्त तळा तालुक्यातील तळगड किल्ल्यावरती असलेल्या शिवलिंगाची पूजा करून अभिषेक करण्यात आला, सकाळी तळा बाजार पेठ मधून श्री. टक्कर यांनी स्वतः आर्धनारी नटेश्वराची प्रतिमा तयार करून त्यांची पूर्ण तळा बाजार पेठ मध्ये मिरवणूक ही काढण्यात आली, तळगड किल्ल्यावरती महिला मंडळ यांचे हळदी कुंकू याचे कार्यक्रम देखील करण्यात आले, त्याचप्रमाणे तळा नगरपंचायतीचे नवनिर्मित नगरसेवक यांचे सत्कार करण्यात आले, शाहीर कांबळे सर यांनी कार्यक्रमा निमित्त पोवाडा सादरकेला, त्या पोवाड्याला भाविकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या काही वर्षा पासून अनेक भाविक तळगडवरील शिवलिंगाचे दर्शनघेण्यास मोठ्या प्रमाणात उपस्थितीत आसतात.




