ब्रेकिंग
पुढच्या ३-४ तासांत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा, ठाण्यासह ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
राज्यासाठी पुढचे ३–४ तास महत्त्वाचे आहे. कारण, हवामान खात्याकडून राज्यातील काही महत्त्वाच्या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील ३ ते ४ तासांत सिंधुदुर्ग, ठाणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची शक्यता आहे. यामुळे या जिल्ह्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात याला असून नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.



