ब्रेकिंग

नालासोपाऱ्यात नराधम बापानेच केला पोटच्या मुलीवर अत्याचार

उपचारादरम्यान मुलीचा मृत्यू / मुलीच्या मृत्यूनंतर आईची तक्रार 

 

भरत पवार – शहर प्रतिनिधी नालासोपारा

नालासोपारा: वडील आणि मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी धक्कादायक घटना नालासोपाऱ्यात उघडकीस आली आहे. एका बापानेच स्वतःच्या 22 वर्षाच्या मुलीवर सातत्याने अत्याचार केल्याचं उघड झालं आहे. पीडित मुलीचा क्षयरोगाने मृत्यू झाल्यानंतर तिच्या आईने नराधम बापाविरोधात तक्रार नोंद केली आहे.

पीडित मुलगी ही क्षयरोगाने आजारी असतानाही नराधमाने हे अत्याचार सुरू ठेवले होते. मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे. नराधम बापाने त्या मुलीला घरात डांबून सतत तिला मारहाण केल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. तसेच त्या मुलीला अश्लील चित्रफीत दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.

पीडित तरुणी ही तिच्या आई – वडिलांसोबत नालासोपारा येथे राहत होती. गेल्या 3 महिन्यांपासून ती क्षयरोगाने त्रस्त होती. आजार बळावल्यानंतर तिला मुंबईच्या जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला.

मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या नराधम बापाने तिच्यावर केलेल्या अत्याचाराला वाचा फुटली. या मुलीचा बाप हा 54 वर्षाचा आहे. तिने त्या मुलीवर सातत्याने अत्याचार केले असून मारहाणही केली होती. या प्रकाराची कुठे वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची धमकी तो नराधम देत होता.

नराधम तिच्या मुलीला बळजबरीने घरात डांबून ठेवत होता आणि तिच्यावर अत्याचार करत होता. पण भीतीपोटी तिने आणि तिच्या आईने कुठेही याची वाच्यता केली नाही. दरम्यानच्या काळात मुलगी गर्भवती राहिली होती. त्यावेळी नराधम बापाने तिचा बळजबरीने गर्भपात केल्याचं समोर आलं आहे.

पीडित मुलीचा मृत्यू क्षयरोगाने झाला असल्याची माहिती रुग्णालयाने दिली. पण नराधम बापाने तिच्यावर सातत्याने अत्याचार केला, तिला मारहाण केली आणि शारिरीक छळ केल्याने मुलीचा मृत्यू झाल्याचं आईने तक्रारीत म्हटलं आहे. त्यावरून आता बापावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!