तालुका

ब्ल्यू जेट दुर्घटनेतील तीन मृतांच्या वारसांना महाड तहसील कार्यालयात धनादेश सुपूर्द

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील ब्ल्यू जेट कारखान्यातील दुर्घटनेत मरण पावलेल्या तीन मृतांच्या वारसांना महाड तहसील कार्यालयामध्ये प्रत्येकी 30 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

सदर मदत ही कंपनीतर्फे करण्यात आली आहे, यावेळी असलम शेख, सोमनाथ वायनडे आणि विशाल कोळी या तीन मृतांच्या वारसांना ही मदत देण्यात आली.

ब्लू जेट दुर्घटनेत अकरा जनाचा मृत्यू झाला होता, कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली तीस लाख रुपयांची मदत आतापर्यंत नऊ मृतांच्या वारसांना देण्यात आली आहे.

यावेळी आमदार भरतशेठ गोगावले, विभागीय पोलीस अधिकारी शंकर काळे, तहसीलदार महेश शितोळे, माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, शिवसेनेचे शहर प्रमुख डॉ. चेतन सुर्वे, नितीन पावले, निखिल शिंदे, राजू पावले इत्यादी उपस्थित होते.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!