महाड मध्ये प्रांताधिकारी पुदलवाड यांचे हस्ते शासकिय ध्वजारोहन
महाड मधील देवदूतांचा गौरवपत्र देऊन सत्कार
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड: भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त महाड मधील शासकिय ध्वजारोहन तहसिल कार्यालय महाडचे प्रांगणात प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी तहसिलदार सुरेश काशिद, पद्मश्री पुरस्कार प्राप्त डॉक्टर हिम्मतराव बावस्कर, सौ. डॉ. बावस्कर, मुख्याधिकारी महादेव रोडगे यांसह महाड मधील विविध पक्षाचे व संघटनांचे पदाधिकारी, व्यापारी, नागरीक उपस्थित होते.
यावेळी पोलिस दलाचे नेतृत्व पीएसआय जगदाळे मॅडम यांनी केले, एनडीआरएफचे पथकही यावेळी उपस्थित होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून गतवर्षी जुलै महिन्यात आलेल्या महापुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी वसुरक्षित स्थळी हलवण्यासाठी ज्या देवदूतां नी जीवाची बाजी लावली अशा सामाजिक संघटना व नागरिकांचा गौरव पत्र देऊन उपस्थित मान्यवरांचे हस्ते सन्मान करण्यात आला.




