जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज व प. पू. कानिफनाथ महाराजांचे लिलामृत ग्रंथाचे पारायण सोहळा साजरा
जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
श्रीवर्धन – अनंत विभूषित जगद्गुरू नरेंद्राचार्याजी महाराज व प. पू. कानिफनाथ महाराज ह्यांच्या कृपाशीर्वादाने दक्षिण रायगड जिल्ह्यात श्रावण महिनाचे औचित्य साधून श्री लिलामृत ग्रंथ पारायण सोहळे आयोजित केले जात आहेत. त्या सोहळ्यामध्ये दिनांक 15 ऑगस्ट 2022 रोजी तालुका श्रीवर्धन सेवाकेंद्र येथे श्री लिलामृत ग्रंथाच एक दिवशीय पारायण करण्यात आले. पारायण सकाळी 9.15 वाजताश्री स्वामीचे नाम गजर करणेत आले व श्री लिलामृत ग्रंथाचे पारायणास सुरवात करणेत आली. पारायणासाठी जिल्हा प्रसिध्दी प्रमुख जितेंद्र दोशी, ज़िल्हा संजीवनी प्रमुख मानसी मोरे यांनी भेट दिली. त्याचबरोबर सेवाकेंद्र मधील 10 भक्तगण यांनी पारायणाच लाभ घेतला. पारायण झाल्यानंतर रक्षाबंधन साजरा करण्यात आले. सेवाकेंद्र मधील श्री लिलामृत पारायण करणे करिता दक्षिण रायगड जिल्ह्याचे जिल्हा निरीक्षक सुनील वीर, ज़िल्हा अध्यक्ष सुधीर पुलेकर, ज़िल्हा महिला अध्यक्षा अंजली जगताप, ज़िल्हा अध्यात्मिक प्रमुख प्रवीण मोरे, तालुका अध्यक्ष अशोक भोसले यांनी मार्गदर्शन व सहकार्य केले.




