अमृत महोत्सवा निमित्त महाड पालिके मार्फत सायकल रॅली
चवदार तळे येथे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते ध्वजारोहन
सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड
महाड : रविवार दिनांक: 14 ऑगस्ट रोजी महाड नगरपरिषद आयोजित स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत महाड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह चवदारतळे येथे महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन ध्वजारोहनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशासक तथामुख्याधिकारी महादेव रोडगे व तहसिलदार सुरेश काशिद, महाड नगरपरिषद, तहसिल कार्यालय यांचे अधिकारी व कर्मचारी व महाडचे नागरीक उपस्थित होते.
त्यानंतर महाडचे आमदार भरतशेठ गोगावले, प्रशासक तथा मुख्याधिकारी महादेव रोडगे, तहसिलदार काशिद, महाड नगरपरिषद, तहसिल कार्यालय यांचे अधिकारी व कर्मचारी व महाडचे नागरीक यांनी चवदार तळे ते साळीवाडा नाका ते बाजारपेठ मार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक ते श्री छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय भवन महाड नगरपरिषद कार्यालयापर्यंत सायकल चालवुन सायकल रॅलीचा समारोप केला.
त्यानंतर महाड नगरपरिषद मालकीचे लाडवली घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प येथे प्रशासक तथा मुख्याधिकारी महादेव रोडगे साहेब व नगरपरिषदेचे बांधकाम अभियंता श्री. सुहास कांबळे, विद्युत अभियंता परेश साळवी, पाणीपुरवठा अभियंता रोहित भोईर, पाटोळे, दीपकमहाडिक, किशोर शिंदे व महाड नगरपरिषदेचे इतर अधिकारी व कर्मचारी यांनी विविध प्रकारची एकुण 49 झाडे लावून माझी वसुंधराअ भियान अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम साजरा केला व पर्यावरण संरक्षण शपथ घेणेत आली.



