तालुका

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त महाड न. प. शाळा क्र.५ च्या विद्यार्थ्यांना मोफत ओळखपत्र व साऊंड सिस्टीम भेट

 

सचिन चांदोरकर – उपशहर प्रतिनिधी महाड

महाड : दि.१५ ऑगस्ट २०२२ रोजी छत्रपति शिवाजी महाराज महाड न. प. शाळा क्र.५ मध्ये सकाळी ध्वजवंदनाच्या कार्यक्रमानंतर सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यावेळेस महाडचे माजी नगरसेवक प्रमोद महाडिक व प्रणिल मोबाईल शॉपचे मालक प्रवीण चांदोरकर यांच्या सौजन्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत ओळखपत्र व साऊंड सिस्टीम सारख्या आवश्यक वस्तू शाळेस भेट दिली. सदर कार्यक्रमास रायगडचा आवाज चे संपादक दिलदार पुरकर तसेच रोहिदास तरूण विकास मंडळ चे अध्यक्ष मयुर चांदोरकर, सदस्य आशिष महाडिक व दिपक उतेकर हे उपस्थित होते.

जुलै २०२१ च्या महापुरामुळे पूर्णतः नुकसान झालेल्या शालेय इमारतीची पाहणी नंतर मान्यवरांनी आम्ही शाळेस सहकार्य करु असे आश्वासन दिले. मान्यवरांचे आभार मुख्याध्यापिका महामुणकर मॅडम व पाडवी यांनी मानले. सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन कर्जावकर यांनी केले तर स्वागत महामूणकर व बेणके यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!