तालुका

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजप तर्फे आयोजित रक्तदान शिबिराचे आयोजन

शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद ५१ रक्तबॅगा संकलित


डॉ
. अनंत खराडे – मुख्य संपादक

माणगाव: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवढा कार्यक्रम अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या  वतीने हाती घेण्यात आलेल्या रक्तदान संकल्प कार्यक्रम माणगावात उत्साहात संपन्न झाला. माणगाव तालुका भाजप तर्फे डॉ. बी.व्ही. लिमये रक्तपेढी नवीन पनवेल वेस्ट यांच्या सहकार्याने  सरलादेवी मंगल कार्यालय या ठिकाणी तालुका भाजपच्या वतीने मंगळवार दि.२० सप्टेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ यावेळेत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला. या शिबिरात ५१ रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान हेच खरे सर्वश्रेष्ठ दान मानून रक्तदान केले. 

या रक्तदान शिबिराचे उदघाटन रक्तदान संकल्प कार्यक्रम सेवा पंधरवडा प्रमुख तथा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवानेते वैकुंठ रवींद्र पाटील यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले, या शिबिराच्या उदघाटन प्रसंगी कार्यक्रमास भाजपचे माणगाव तालुकाध्यक्ष संजय आप्पा ढवळे, जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, किसान मोर्चाच्या कोकण विभागीय अध्यक्षा शर्मिला सत्वे, महिला आघाडी राज्य सदस्य यशोधरा गोडबोले, जिल्हा सदस्य सुरेंद्र साळी, जिल्हा युवामोर्चा उपाध्यक्ष चिन्मय मोने, माणगाव नगरसेवक राजेश मेहता, महिला मोर्चा माणगाव तालुकाध्यक्षा अश्विनी महाडिक, जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, प्राजक्ता शुक्ला, माणगाव शहराध्यक्ष नितीन दसवते, महिला आघाडी भटका समाज तालुकाध्यक्षा नीलम काळे, तालुका उपाध्यक्ष बाबुराव चव्हाण, अपंग सेल तालुकाध्यक्ष मुकेश शिंदे, तालुका सरचिटणीस गोविंद कासार, उमेश साटम, तालुका युवामोर्चा अध्यक्ष विशाल गलांडे, अनुसूचित जमाती मोर्चा तालुकाध्यक्ष अमोल पवार, तुषार नवगणे, अनिकेत भौड, युवराज मुंढे, युवामोर्चा सरचिटणीस दिनेश गोरीवले, डॉ. बी.व्ही. लिमये, रक्तपेढी नवीन पनवेलचे डॉ. प्रकाश दिवे, प्रतीक्षा कुरंगले, मंगेश देशपांडे, किरण देशपांडे, मनुजा पाटील, सोनाली मोकल, सविता भगत, नम्रता लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी शिबिरास भेटी दिलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच रक्तदात्यांचे भाजप तालुकाध्यक्ष संजय आप्पा ढवळे यांनी स्वागत करीत आभार मानले.

यावेळी प्रसार माध्यमांजवळ बोलताना सेवा पंधरवडा प्रमुख तथा भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवानेते वैकुंठ रवींद्र पाटील म्हणाले कि, सेवा पंधरवड्यामध्ये याठिकाणी आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर, सर्व तलाव स्वच्छता अभियान, गांधी जयंतीच्या दिवशी स्वच्छता अभियान आहे. याठिकाणी मोदीजींच्या जीवनावर जी काही प्रदर्शने आहेत त्याठिकाणी दाखवण्यात येणार आहेत. त्याचबरोबर दिव्यांगांना त्याठिकाणी विविध प्रकारचे साहित्य किंवा त्यांना जी काही अवयव वाटप, टीबी पेशंटना दत्तक घेण्याचे कार्य सुद्धा आम्हाला याठिकाणी सांगण्यात आलेलं आहे, जनतेची सेवा करण्यासाठी हा सेवा पंधरवडा आयोजित करण्यात आलाअसून माणगावात भाजपचे तालुकाध्यक्ष संजय आप्पा ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली चांगल्या प्रकारे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याने मी त्यांना व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा व धन्यवाद दिले.

भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संपूर्ण देशभरामध्ये सेवा पंधरवड्याचा आयोजन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी केले आहे. रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री विद्यमान सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब यांचाही आजचा वाढदिवस आहे. या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आज १७ तारखेपासून आम्ही सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे  आयोजन केलेले आहे, आज माणगाव तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने याठिकाणी रक्तदान शिबीर होत आहे. माणगाव तालुका भाजप अध्यक्ष संजय आप्पा ढवळे व त्यांचे सर्व  सहकारी, महिला मोर्चा, युवा मोर्चा सर्व पदाधिकारी निश्चितपणाने चांगला संकल्प या देशाच्या समाजपयोगी काहीतरी आपण उपयोगी पडावं. एक देश सेवेचं व्रत मोदीजींनी स्वीकारले आहे. एक वैश्विक महागुरू म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. आपण काहीतरी यांच्यात खारीचा वाटा उचलू शकतो म्हणून एक समाजपयोगी काहीतरी काम सामाजिक बांधिलकीचा जतन करून काम हाती घ्यावं.म्हणून हा आजच्या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.संपूर्ण जिल्हाभरात हे शिबीर यशस्वी करू निश्चितपणाने याची आम्हाला खात्री आहे.या शिबिरास भाजपचे जेष्ठ नेते तथा रायगड जिल्हा संपर्क प्रमुख कोकण विकास आघाडी मुंबईचे कृष्णा कोबनाक, पनवेलचे भाजपचे महामंत्री सुशील शर्मा, रायगड जिल्हा भाजप संघटक सरचिटणीस अविनाश कोळी, भाजप महिला मोर्चाच्या दक्षिण रायगड जिल्हाध्यक्षा हेमा मानकर, माणगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सचिन बोंबले, माणगाव नगरसेवक दिनेश रातवडकर, कपिल गायकवाड, स्वीकृत नगरसेवक हेमंत चंद्रकांत शेट, शिवसेना शिंदे गटाचे माणगाव उपशहरप्रमुख प्रसाद धारिया यांच्यासह असंख्य मान्यवरांनी भेटी देऊन भाजपच्या या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले. या शिबिरात ९९ वेळा रक्तदान केलेले माणगावचे व्यापारी निलेश चंद्रकांत मेथा यांचे तालुका भाजपचे अध्यक्ष संजय अप्पा ढवळे व सहकाऱ्यांच्या वतीने खास सत्कार करण्यात आला.

माणगाव येथील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रुती निकम यांनीही शिबिरात रक्तदान केल्याने त्यांचाही तालुका भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन तालुका भाजपतर्फे सत्कार करण्यात आला. माणगाव तालुका भाजप तर्फे आयोजित केलेले हे रक्तदान शिबीर यशस्वीरीत्या संपन्न करण्यासाठी माणगाव तालुका भाजपचे सर्व पदाधिकारी, सदस्य, महिला मोर्चा पदाधिकारी व सदस्य, युवामोर्चा पदाधिकारी व सदस्य  तसेच बी.व्ही. लिमये रक्तपेढी नवीन पनवेल यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!