तालुका

अंतर्गत रस्ता विकास कामांकरिता ५ कोटी रुपये निधी आमदार महेंद्रशेठ दळवी यांच्या प्रयत्नातून मंजूर

मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे व मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मुरुडच्या विकास कामांकरिता निधी मंजूर

 

रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला

बंटी पाटील – तालुका प्रतिनिधी अलिबाग

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे तसेच महाराष्ट्राचे नगरविकास मंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या माध्यमातून व अलिबाग – मुरुडचे आमदार श्री. महेंद्रशेठ दळवी यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून मुरुडच्या सर्व अंतर्गत रस्ताविकास कामांकरिता एकूण ५ कोटी रुपये एवढा भरघोस निधी मंजूर झाला आहे. त्या अनुषंगाने जिल्हापरिषद सदस्या मानसी दळवी यांच्या शुभहस्ते व मुरुड–जंजिरा नगरपरिषद माजी नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व ऋषिकांत डोंगरीकर मुरुड तालुका प्रमुख, अशील ठाकूर मुरुड शहर प्रमुख, मनोज कामाने, उप तालुका प्रमुख व तालुक्यातील पदाधिकारी, नगरसेवक  वकार्यकर्ते यांच्या उपस्थितीत मुरुड–जंजिरा नगरपरिषद हद्दीतील दस्तुरी नाका ते कासकर ते पुरकर ते अतिक खतीब घर रस्ता, अन्नपूर्णा बिल्डिंग ते गॅस गोडावून पर्यंत रस्ता, गोल बंगला चौक ते रणदिवे आळी ते श्री. दत्त मंदिर पायऱ्या पर्यंत रस्ता, गणेश आळी नाका ते गोलबंगला चौक पर्यंत, गणेश आळी नाका ते मारुती नाका, पेठ मोहल्ला (डॉ. किडबाई रस्ता) ते लक्ष्मीखार रस्ता, गणेश आळी नाका तेशाळा क्रमांक २ ते हायस्कुल रोड ते शाळा क्रमांक १ रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचा शुभारंभ करण्यात आला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!