तालुका

तळा तालुक्यातील पत्रकारांनी केला पोलिसांचा सत्कार

 

सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा

तळा तालुक्यातील अतिशय ग्रामीण भाग आसलेल्या ठिकाणी महिलांची छेडछाड तसेच लूटमार करणाऱ्या चोरट्यास केले जेरबंद. त्यामुळे तळा तालुक्यात ग्रामीण भागातील ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सर्व जनसामान्यांची मनातील दहशत तळा पोलीसांनी दूर केली.

तळा पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल तळा तालुका पत्रकारांच्या वतीने तळा पोलीस ठाणे येथील पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे, संजय शिंदे, तसेच सुरेश पवार व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

तळा तालुक्यातील ग्रामीण भाग असलेले चोरीवली, तारणे, कासेवाडी पन्हेली (गायमुख)या भागात या चोरट्या इसमाने अक्षरशः धुमाकूळ घातला होता.महिला वर्गाची छेडछाडी तसेच दागिने मौल्यवान वस्तूंचे चोरीप्रकरण उघडकीस आले होते. गेली पाच सहा महिने तालुक्याबरोबरच ग्रामीण भागात महिलांच्या मनात मोठ्या प्रमाणावर दहशत तसेच भीतीचे वातावरण पसरले होते फिर्यादी वरून तळा पोलिसांनी सापळा रचला होता या सापळ्यात चोरट्या इसमास पकडण्यात यश आले आहे. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी एक पथक तयार केले होते यात संजय शिंदे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे, तसेच सुरेश पवार यांचा समावेश होता.सापळा रचून यशस्वीरित्या या पथकाने कामगिरी पार पाडली आणि या चोरट्याला पकडण्याचे काम केले.

तळा पत्रकार संघातर्फे तळा पोलीस स्टेशन तसेच तळा पोलीस कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आला. या निमित्ताने उपाध्यक्ष किशोर पितळे यांनी पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले तर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवराज खराडे यांचे गुलाब पुष्पगुच्छ देऊन सन्मान केले. त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल सर्व स्तरावरून तळा पोलीस स्टेशन व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांवर कौतुकाची थाप पडत आहे. यावेळी पत्रकार. टी.डी आंबेगावे,किशोर पितळे,संध्या पिंगळे, श्रीकांत नांदगावकर, नजीर पठाण, सुरेंद्र शेलार तसेच सर्व पत्रकार व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!