ब्रेकिंग

मला बोलता येतंय तोपर्यंत चर्चेला या, नंतर येऊन उपयोग नाही; जरांगेंचा सरकारला इशारा

पाणी पिण्यास नकार - मनोज जरांगे

 

अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक

जालना : सरकारशी कोणताही संवाद झाला नसून, त्यांना विचारण्यात आलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील मिळाली नाहीत. त्यांच्याकडून कसे उत्तर घायचे यासाठी आणखी दोन-तीन दिवस वाट पाहणार आहे. त्यांना माणुसकी समजत नसेल तर त्यांना उत्तर मराठाच आहे. दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे तानाजी सांवत म्हणत असतील, तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दोन दिवसांत आरक्षण मिळणार असल्याचे का म्हणत नाही. त्यांनी लगेच याबाबत सांगावे, असे जरांगे म्हणाले आहेत. 

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. या काळात त्यांनी अन्न,पाणी घेण्यास देखील नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावत आहे. तर, गावतील नागरिकांकडून त्यांना सतत पाणी पिण्याची विंनती केली जात आहे. सोबतच, छत्रपती संभाजीराजे यांनी देखील फोन करून जरांगे यांना पाणी घेण्याची विनंती केली. मात्र, आता आपण आरक्षण मिळेपर्यंत पाण्याचा घोट देखील घेणार नसल्याचे जरांगे यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!