ब्रेकिंग

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या कोअर कमिटीची तातडीची बैठक, बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार

ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

 

विशाल मोहिते – उपसंपादक कोकण विभाग 

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजपच्या कोअर कमिटीचा तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही बैठक बोलावण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी सोमवारी रात्री आठ वाजता ही बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान या बैठकीमध्ये भाजप मराठा आरक्षणावर त्यांची भूमिका जाहीर करणार का याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून राहिलंय.

राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय. त्यातच सोमवार 30 ऑक्टोबर रोजी आरक्षणसाठी नेमण्यात आलेल्या उपसिमिची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिंदे समितीने अहवाल सरकार समोर सादर केला. दरम्यान आता हा अहवाल मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. या शिंदे समितीने 1 कोटी 72 लक्ष नोंदी या समितीने तपासल्या आहेत. त्यात 11 हजार 530 नोंदी मिळाल्या आहेत. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना दाखले देणार आहोत. याबाबत तहसीलदारांची बैठक घेऊन उद्यापासूनच दाखले द्यायला सुरू करणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!