शास्त्री नगर ठाणे येथे उत्कर्ष युवा मित्र मंडळ पु. मोरणी च्या वतीने वाघजाई महाकाली चषकाचे आयोजन
समीर पवार – तालुका प्रतिनिधी पोलादपूर
ठाणे : उत्कर्ष युवा मित्र मंडळ पु. मोरणीच्या वतीने रविवार दि. ०५ फेब्रुवारी रोजी शास्त्री नगर ठाणे येथे प्रथमच श्री वाघजाई महाकाली चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, समाजसेवक सुभाष शिंदे, युवासेना कोअर कमिटी सदस्य विकासशेठ गोगावले, महाड तालुका सहसंपर्कप्रमुख प्रमोददादा गोगावले, युवासेना शाखाप्रमुख विजय मालुसरे, समाजसेवक विनोद दादा पाटील, गोल्डमॅन हरीश दादा पाटील, समाजसेवक भूषण मोरे, समाजसेवक पुरुषोत्तम ठाकूर, कांदाटी असोसिएशन अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव खजिनदार व सर्व पदाधिकारी, सोळा गावातील सर्व जेष्ठ श्रेष्ट मंडळी उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम विजेता शिंदी संघ, द्वितीय विजेता वलवण संघ तर तृतीय क्रमांक चकदेव संघ मानकरी ठरले, मालिकाविर म्हणून शुभम मोरे, उत्कृष्ट फलंदाज विकास जाधव, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अविष्कार जंगम, उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विकास मोरे यांची निवड करण्यात आली.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उत्कर्ष युवा मित्र मंडळ पु. मोरणी च्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली व श्री. क्रीष्णा शिंदे यांच्या स्थानिक मंडळ शिवराज मित्र मंडळ व तिरंगा मित्र मंडळ ठाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले, स्पर्धा उत्तम रित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी जो हातभार लावला व स्पर्धेची शोभा वाढवली त्या साठी सर्वांचे मनपुर्वक आभार मानले.



