तालुका

आमदार गोगावले यांचा काँग्रेसला झटका / शेकडो ग्रामस्थ शिंदे गटात सामील

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड : दि. 27 महाड विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पक्ष प्रवेशाचा धडाका लावला असून त्यांच्यावर विश्वास ठेवून अनेक गावांचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश होताना दिसून येत आहे.

ह्याच पार्श्वभूमीवर किल्ले रायगडच्या ऐतिहासिक भूमीत वसलेल्या व राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पाचाड गावातील कुणबी नगरच्या शेकडो ग्रामस्थांनी काँग्रेसला रामराम करीत युवासेना कोअर कमिटी सदस्य विकास गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

आमदार भरत गोगावले हे एकमेव आमदार आहेत की, ते सर्व गाव वस्त्यांवर फिरून ग्रामस्थांच्या सुख दुःखात सामील होतात त्याचप्रमाणे नागरिकांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करून नागरिकांचे मूलभूत प्रश्न देखील मार्गी लावतात. त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आम्ही पाचाड कुणबीनगरचे सर्व ग्रामस्थ आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश करीत आहोत. असे उद्गार कुणबी नगरचे सेक्रेटरी सुरेश महादे यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.

यावेळी सर्व कुणबीनगरच्या ग्रामस्थांनी आमदार भरत गोगावले यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्धार केला. सध्या आमदार गोगावले यांनी आपल्या मतदारसंघात पक्षप्रवेशाचा धडाकाच लावला असून विरोधकांना मात्र चांगलाच घाम फोडला आहे.

या पक्षप्रवेशामुळे येणाऱ्या आगामी ग्रामपंचायत निवडणूकीत बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पारडे निश्चितच जड होईल यात शंकाच नाही.

या प्रवेश प्रसंगी विकास गोगावले यांच्यासमवेत उपजिल्हा प्रमुख विजय सावंत, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, कुणबी नेते एकनाथ सुकुम, महाड शहर संपर्क प्रमुख सिद्धेश पाटेकर, वाळण संपर्क प्रमुख गंगाराम औकिरकर, महाड शहर युवा सेना सदस्य सिद्धेश मोरे, महाड उपशहर प्रमुख श्लोक पाटील, छत्रीनिजामपूर सरपंच प्रभाकर सावंत, माजी सरपंच देविदास गायकवाड, माजी सरपंच जयेश लामजे, विठ्ठल लामजे त्याचप्रमाणे कुणबीनगर तर्फे किसन बाबू शिगवण, सुरेश महादे, पांडुरंग मोरे,गुणाजी महादे, सुभाष महादे, दत्ताराम बामणे, वसंत बामणे ,भागोजी मोरे, यशवंत भोसले ,दीपक महादे, इत्यादी ग्रामस्थ, महिला भगिनी व चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!