आरोग्य व शिक्षण

पावसाचा रेड अलर्ट. मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूरमधील शाळांना उद्या सुट्टी जाहीर

 

संदेश चौधरी – संपादक कोकण विभाग

राज्यातील विविध जिल्ह्यात अतिमुसळधार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई, रत्नागिरी, चंद्रपूर या जिल्ह्यात शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे, रायगडसह इतर जिल्ह्यांमध्ये परिस्थितीनुसार जिल्हा प्रशासन निर्णय घेणार असल्याची माहिती आहे.

भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगराला आज रात्री 8 ते उद्या दुपारपर्यंत अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक 27 जुलै 2023 रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

मुंबईकरांनी रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे.

पालघर जिल्ह्याला हवामान खात्याकडून उद्या ऑरेंज अलर्ट आहे, पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा सुरू राहतील अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे. तर, ठाण्यातही शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!