तालुका

भावे सुतारवाडी येथे काँग्रेसला खिंडार / ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी केला आमदार भरतशेठ गोगावले यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश 

सचिन चांदोरकर - तालुका प्रतिनिधी महाड 

महाड : दि २५ महाड विधानसभा मतदारसंघ वरंध विभागातील संपूर्ण सुतारवाडी मधील ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांनी शिवसेना उपनेते पक्षप्रतोद आमदार भरतशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस मधून शिवसेनेत पक्ष प्रवेश केला.

अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून कोणत्याही प्रकारची विकास कामे न झाल्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले हे करत असलेल्या मतदारसंघातील विकास कामांवर विश्वास ठेवत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेश करत आहोत असे यावेळी प्रवेशकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले,

यावेळी तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर, उपतालुकाप्रमुख संदीप झांजे, उपविभागप्रमुख गोपीनाथ सावंत, विभाग प्रमुख लक्ष्मण भोसले, भावे सरपंच अशा अंकुश जाधव, शाखाप्रमुख पांडुरंग जाधव, प्रताप मस्के, अंकुश जाधव, चंद्रकांत जाधव, आणि या विभागातील शिवसेना युवा सेना पक्षाचे पदाधिकारी लोकप्रतिनिधी इत्यादी उपस्थित होते.

यावेळी आमदार गोगावले यांनी प्रवेश कर्त्यांचे भगव्या पताका घालून शिवसेना पक्षात स्वागत केले आणि आपणा सर्वतोपरी विकास कामांच्या माध्यमातून लागेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन प्रवेश करताना दिले तसेच शिवसेना पक्षात तुम्हाला सन्मानाची वागणूक दिली जाईल असे अभिवचन देत त्यांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!