तालुका

मुरुड मधील शीघ्रे येथे मोटारसायकल चा भीषण अपघात

अपघातामध्ये युवकाच्या डोक्याला दगड लागून जागीच मृत्यू

विवेक चाफेकर – तालुका प्रतिनिधी मुरुड जंजिरा

मुरुड जंजिरा शहरातील दत्तवाडी परिसरात मुरुड येथून शीघ्रे कडे मोटारसायकल ( पल्सर २२० ) ने जात असताना दोन युवकांचा मोटारसायकल रस्त्यावरील दगडावर आदळल्याने दोन युवकांचा अपघात झाला, या झालेल्या अपघातामध्ये २२ वर्षीय अतिश नंदकुमार मिसाळ या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे.

मुरुड येथून शीघ्रेकडे पल्सर २२० एमएच ०१ सीबी १६४५ या मोटर सायकल वरून अतिश मिसाळ व अशोक धोंडू पाटील हे दोघेही जात असताना, दत्तवाडी परिसरात आले असताना गाडी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या संरक्षक दगडावर जोरात आदळली, या अपघातामध्ये  चालक अतिश मिसाळ याचे दगडावर डोके आदळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यामागे बसलेला अशोक पाटील हा जखमी झाला असून जखमीला तातडीने अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पुढील इलाजासाठी पाठवण्यात आले आहे, अपघाती मृत्यू झाल्याने शीघ्रे गावात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!