ब्रेकिंग

महापुरुषांचा सोशल मीडियावर अवमान, साताऱ्यातील पुसेसावळी येथे दंगल; हिंसक जमावाने घरे पेटवली

समीर पवार – तालुका प्रतिनिधी

सातारा : समाजमाध्यमांवर महापुरुषांची बदनामीकारक मजकूर प्रसारीत झाल्याच्या घटनेचे रात्री खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे तीव्र पडसाद उमटले. एका गटाने विशिष्ठ समुदायास लक्ष्य करत जाळपोळ, दगडफेक करत प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत.

पुसेसावळी येथील एका समाजमाध्यम समुहावर महापुरुषांविषयी चुकीचा मजकुर शेअर करण्यात आला होता. हा मजकुर एका विशिष्ठ समुदायातील युवक प्रसारीत करत असल्याचा संशयावरून रात्री 9.30 च्या सुमारास बहुसंख्य समाजातील युवक पुसेसावळी बाजारात जमा झाले. या युवकांनी विशिष्ट समाजाची घरे, दुकाने, हातगाडे, वाहने लक्ष्य करत दगडफेक सुरू केली. याचदरम्यान हिंस्त्र जमावाने घरे, दुकाने यांना आग लावण्यास सुरुवात केली. 2 ते 3 हजार युवकांचा जमान आक्रमकपणे जाळपोळ करत पुढे सरकत होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!