तालुका

महाड विकास चर्चामंच समूहाने रक्तदानातून जपली सामाजिक बांधिलकी

सोशल मीडियाच्या विधायक उपयोगाचे उत्तम उदाहरण

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी रायगड 

महाड:  महाड विकास चर्चा मंच या महाड शहरातील सोशल मीडिया ग्रुपने रक्तदानाचा तुटवडा व गरज ओळखून तातडीच्या रक्तदान शिबिराद्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे.

महाडमधील काही तरुणांनी एकत्रित येऊन महाड तालुक्याचा तसेच शहराच्या विकासाच्या मुद्द्यावर एकत्रितपणे स्थापन केलेला ग्रुप म्हणजे महाड विकास चर्चा मंच. गणेश कारंजकर यांसह हजारो तरुणांनी महाड शहरासह तालुक्यातील समस्या, विकासात्मक दृष्टिकोन, संकटकालीन परिस्थिती, गरजवंताला मदत अशा नानाविध प्रकारे या सोशल मीडिया ग्रुप द्वारे सामाजिक बांधिलकी जपली आहे. विधायक दृष्ट्या सोशल मीडियाचा उपयोग कसा करावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रुप होय.

येणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात चाकरमानी तसेच गणेशभक्तांची वर्दळ होते त्या निमित्ताने काही अपघात, संसर्गजन्य आजार या दृष्टीने या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. सध्या देखील असाच तुटवडा जनकल्याण रक्तकेंद्र महाड येथे निर्माण झाला होता ही बाब लक्षात येताच महाडविकास चर्चामंचच्या तरुणांनी रविवार दिनांक 10 सप्टेंबर 2023 रोजी महाडच्या हुतात्मा दिनाचे औचित्य साधून जनकल्याण रक्त केंद्र महाड येथे या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.

यामध्ये एकूण 27 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रक्ताची तातडीची गरज ओळखून या ग्रुपच्या माध्यमातून अशा प्रकारे रक्तदान शिबिर आयोजित केल्याबद्दल जनकल्याण रक्तकेंद्र महाड व्यवस्थापनाने या ग्रुप सदस्यांचे मनापासून धन्यवाद मानले. अशाप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून जर सामाजिक बांधिलकी जपली गेली तर येणाऱ्या काळामध्ये सोशल मीडियाचा विधायक वापर निश्चितच वाढेल यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!