तालुका
मनसेच्या प्रयत्नांतून महाडमधील मच्छी मार्केट झाले स्वच्छ
सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड
महाड दि.17 महाड शहरातल मच्छी मार्केट परिसर अनेक वर्षांपासून अस्वच्छतेच्या गर्गेत सापडले होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेन सातत्याने या परिसराच्या स्वच्छतेची मागणी लवून धरली होती.
मनसेचे शहर उपाध्यक्ष दीपक चव्हाण यांनी महाड नगर पालिका प्रशासनाकडे केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यथ आले आहे. गेल्या दोन तीन दिवसापासून नगर पालिका सफाई कामगारांच्या मदतीने प्रशासनाने या भागात स्वच्छतेचे काम सुरु केले आहे. त्यामुळे या भागाचा कायापालट झाल्याचे दिसून येत आहे.
या स्वच्छता कामाचे मच्छी विक्रेते आणि या परिसरातील रहिवाशांनी स्वागत आणि कौतुक केले असून मनसे आणि नगर पालिका प्रशासनाला धन्यवाद दिले आहेत.



