नोकरी

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन | इच्छुकांनी लाभ घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

स्वप्नील ढवण - उपसंपादक

जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” च्यानिमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या मार्गदर्शनाने जिल्ह्यातील कुशल / अकुशल उमेदवारांसाठी ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा दि. 17 ते 19 मार्च 2022 या कालावधीत सकाळी 10.00 ते सायंकाळी 06.00 या वेळेत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता या विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने होणार आहे.

जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या वेबपोर्टलवर यापूर्वीच नोंदणी केलेली असेल तर या वेब पोर्टलवरील Employment Job Seeker (Find a Job) Jobseeker Login यामध्ये आपला नोंदणी क्रमांक म्हणजेच युजर आयडी व पासवर्ड वापरुन नोंदणीतील आपली सर्व माहिती अद्यावत करावी. तसेच ज्या उमेदवारांनी या विभागाच्या वेबपोर्टलवर नोंदणी केलेली नाही त्यांनी https://www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर Employment Job Seeker (Find a Job) Register या ऑप्शन्सवर क्लिक करुन सर्व अद्यावत माहिती भरुन नवीननोंदणी करावी, नोंदणी झाल्यानंतर नोंदणी करताना भरलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर उमेदवारास प्राप्त झालेला नोंदणी क्रमांक वपासवर्ड वापरुन वेब पोर्टलवरील Employment-Job Seeker (Find a Job) Jobseeker. Login मध्ये Registration Id (नोंदणी क्रमांक) व पासवर्ड भरुन Login वर क्लिक करावे. त्यानंतर दिसणाऱ्या आपल्या नोंदणीच्या माहितीतील Pandit Dindayal Upadhyay Job Fair वर क्लिक करुन दिसणाऱ्या रोजगार मेळाव्यांच्या यादीतील आपला जिल्हा निवडून Action-view details मध्ये रोजगार मेळाव्याची माहिती पहावी व vacancy listing मध्ये Terms and Conditions मधील Agree वर क्लिक करुन रिक्त पदांची माहिती पहावी व Apply ऑप्शनवर क्लिक करावे त्यानंतरच ऑनलाईन रोजगार मेळाव्यातील आपला सहभाग पूर्ण होईल.

आपण रिक्त पदांकरीता Apply वर क्लिक केल्यानंतर संबंधीत उद्योजकास वेबपोर्टलवर इच्छुक उमेदवारांची शैक्षणिक, व्यावसायिक इत्यादी माहिती प्राप्त होते. त्यामुळे त्यांच्याकडील रिक्त पदांकरीता ऑनलाईन पध्दतीने मुलाखत घेण्याकरिता आपणाशी संपर्क साधणेशक्य होते, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त शा. गि. पवार यांनी दिली असून संबंधितास काही समस्या असल्यास या कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 02141-222029 किंवा भ्रमणध्वनी क्र. 9820452264 वर संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!