भारतीय लष्करामध्ये अग्निपथ योजनेद्वारे रायगड जिल्हयातील युवकांसाठी मुंबई, ठाणे येथे अग्निवीर भरतीचे आयोजन
स्वप्नील ढवण – उपसंपादक
भारतीय लष्करामध्ये अग्निपथ योजनेद्वारे अग्निवीरांच्या भरतीसाठी रायगड जिल्हयामधील इच्छूक उमेदवारां करीता दि. 1 जुलै 2022 पासून ऑनलाईन नोंदणी सुरु करण्यात आलेली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत उमेदवारांना ४ वर्षांसाठी भरती करण्यात येणार असूनयामध्ये अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर टेक्नीकल, अग्निवीर टेक्नीकल ( ॲव्हीएशन/अम्युनिशन एक्झामिनर ), अग्निवीर क्लर्क/स्टोअर कीपर, टेक्नीकल, अग्निवीर ट्रेडसमन जनरल (आठवी पास) आणि अग्निवीर ट्रेडसमन टेक्नीकल या पदांचा समावेश आहे.
भरती प्रक्रिया दि.20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीमध्ये अब्दूल कलाम आझाद स्पोर्टस स्टेडियम, कौसा व्हॅले, मुंब्रा, ठाणे येथे राबविण्यात येणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी यशस्वीरित्या अर्ज करतील त्यांना शारिरीक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि शारिरीक मापन चाचणी (PMT) मध्ये उपस्थित राहण्यासाठी बोलाविले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय साडेसतरा ते 23 वर्षे दरम्यान असावे. इच्छूक उमेदवारांनी https://joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देऊन सविस्तर माहिती ज्ञात करूनघ्यावी. ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख दि. 3 ऑगस्ट 2022 अशी आहे.
तरी जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी अग्निवीर भरतीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हासैनिक कल्याण अधिकारी डॉ. पद्मश्री बैनाडे यांनी केले आहे.