पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबा अनंतात विलीन
पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आईला दिली मुख्यअग्नी
डॉ. अनंत खराडे – मुख्य संपादक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी अनंतात विलीन झाल्या आहेत. पंतप्रधान मोदी आणि त्यांचे धाकटे बंधू पंकज मोदी यांनी आईला मुख्यअग्नी दिला. गुजरातमधील गांधीनगर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. साश्रू नयनांनी पंतप्रधान मोदींसह त्यांच्या भावांनी हिराबेन यांना अखेरचा निरोप दिला.
हिराबा यांचं आज 30 डिसेंबर रोजी पहाटे साडेतीन वाजता निधन झालं, त्या 100 वर्षांच्या होत्या. हिराबेन यांना श्वास घेण्याचा त्रास होत असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर उपचार सुरु असताना आज पहाटे त्यांची अखेरचा श्वास घेतला. यानंतर त्यांचे पार्थिव पी.एम मोदींचे धाकटे भाऊ पंकज मोदी यांच्या गांधीनगरमधील घरी आणण्यात आलं. जिथे पंतप्रधान मोदी पोहोचले आणि त्यांचं अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली वाहिली. यानंतर पंतप्रधान मोदी यांनीही आईच्या पार्थिवाला खांदा दिला.



