महाराष्ट्र

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकीनाका संघर्षनगरात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व क्रीडा संकुलाचा पायाभरणी व भूमीपूजन सोहळा संपन्न 

 

अभिजीत ढाणिपकर – सहसंपादक महाराष्ट्र राज्य

मुंबई महानगरपालिकेच्या वतीने साकीनाका येथील संघर्षनगरात ४०० कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आणि क्रीडा संकुलाचा पायाभरणी आणि भूमीपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

मुंबई हे एक आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे, त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानीही आहे. त्यामुळे मुंबईत परदेशी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. त्यानुसार मुंबई शहराचे सुशोभीकरण करून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाटावे यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचमुळे मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत ११ हजार कोटींची भर पडली आहे, असे यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पायाभूत सोयी सुविधांचे सर्वाधिक प्रकल्प महाराष्ट्रात सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारकडून राज्याला निधी उपलब्ध होत आहे. त्यामुळे राज्यासह मुंबई शहरातील विविध प्रकल्प मार्गी लागले आहेत.

नागपूर येथील फुटाळा तलावाच्या धर्तीवर पवई तलावात मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून संगीत कारंजे साकारण्यात येणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. चांदिवली येथील या संघर्ष नगर परिसराला मूलभूत सोयीसुविधा पुरवून ते सुंदर नगर करण्यात येईल. राज्य सरकार सर्वसामान्य माणसाचे सरकार असून त्यांच्यासाठी आतापर्यंत विविध निर्णय आम्ही घेतले आहेत. त्यासोबतच असाल्फा व्हिलेज येथील ४८ कुटुंबांसाठी खोल्या उपलब्ध करून देण्यात येतील असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार दिलीप लांडे, आमदार भरत गोगावले तसेच या परिसरातील लोकप्रतिनिधी, महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी आणि चांदिवली परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!