तालुका

कावळे कुंभार्डे येथे नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभहस्ते संपन्न

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड 

महाड : महाड विधानसभा मतदारसंघ वीन्हेरे विभागातील कावळे कुंभार्डे येथे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांमुळे राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ आज दिनांक 3 जानेवारी रोजी संपन्न झाला.

या वेळी विभागातील बाळासाहेबांची शिवसेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी, ग्रामस्थ इत्यादी उपस्थित होते.

यावेळी आपल्या मार्गदर्शनात गोगावले यांनी सांगितले की संपूर्ण महाड विधानसभा मतदारसंघातील गावे, वाड्या, वस्त्या पाण्यापासून वंचित राहणार नाहीत, याची आम्ही दक्षता घेतली आहे, त्यामुळे प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये घर तिथे नळ असा संकल्प आम्ही केलेला असून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत, तसेच मतदारसंघात जी काही कामे असतील ती देखील प्रगतीपथावर आहेत, गाव नसेल की तिथे आमदार भरतशेठ गोगावले पोचले नाहीत किंवा तिथे त्यांनी कोणती विकास कामे केली नाही आपणास लागेल ते सहकार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करत आहोत, जी काही उर्वरित विकास कामे असतील ती देखील लवकरच पूर्ण करणार असल्याचे यावेळी उपस्थितांना आश्वासन दिले, विन्हेरे विभाग हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि बालेकिल्लाच राहील याची कोणीही चिंता करण्याची गरज नाही किती आले किती गेले तरी विकास कामे ही आपणच करणार असल्याचे देखील यावेळी गोगावले यांनी सांगितले.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!