तालुका

वीरेश्वर तलाव सौदर्यीकरणाच्या कामाचे भूमिपूजन

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड

महाड : महाड शहराचे ऐतिहासिक आणि धार्मिक वैभव असलेल्या वीरेश्वर मंदीर परिसराच्या सौदर्यीकरणाच्या कामाचे आज भूमीपूजन करण्यात आले. पहिल्या टप्यामध्ये अडीच कोटी रुपये खर्च करुन वीरेश्वर तलावाचे संवर्धन आणि सौंदर्यीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देवस्थानचे सरपंच दीपक वारंगे यांनी दिली.

देवस्थानचे सरपंच दीपक वारंगे याच्याच हस्ते हे भूमीपूजन करण्यात आले. यावेळेस उपससंच रमेश नातेकर, पंच अनंत शेठ, दिलीप पार्टे, गणेश वडके, संजय पवार यांच्यासह माजी नगराध्यक्ष प्रा. सूर्यकांत शिलीमकर, संदीप जाधव, सुनील कविस्कर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बिपीन म्हामुणकर, माजी नगरसेवक सुनील अगरवाल, शिवसेनेचे (ठाकरे गट ) अमित मोरे, रवि शिंदे आदि मान्यवर आणि भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वीरेश्वर मंदिर सुशोभिकरणासाठी तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र विकास योजनेतून साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यात देवस्थानच्या पंच्च्याहत्तर लाख रुपयांचाही समावेश आहे. या निधीपैकी अडीच कोटी रुपयांचा निधी प्रत्यक्षात उपलब्ध झाला आहे. त्यातून वीरेश्वर तलावाची स्वच्छता , तलावाभोवती संरक्षक भिंत , पायऱ्या आणि तलावाचे सौदर्याकरण ही कामे करण्यात येणार आहेत. महाड नगर पालिकेच्या माध्यमातून ही सर्व कामे होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!