तालुका

एम.एम.ए अंतर्गत क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ / महाड उत्पादक संघटनेेचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या हस्ते या स्पर्धाचा शुभारंभ

 

सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड 

महाड दि. 8 महाड उत्पादक संघटनेच्या अंतर्गत क्रिकेट स्पर्धेला सोमवारी शानदार प्रारंभ झाला. महाड उत्पादक संघटनेेचे अध्यक्ष संभाजी पाठारे यांच्या हस्ते या स्पर्धाचा शुभारंभ करण्यात आला.

महाड औद्योगिक वसाहत मधील कारखान्यातील कर्मचारी, कामगारां मधील क्रीडा नैपूण्याला वाव मिळावा यासाठी एमएमए क्रीडा समितीच्यावतीने या स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

यावर्षी एम एम ए बिरवाडी मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या क्रिकेट स्पर्धेत विविध कारखान्यांच्या 34 संघानी सहभाग घेतला आहे.

एमएमऐचे चेअरमन संभाजी पाठारे यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. कोरोनामुळे दोन वर्षे या स्पर्धा होवू शकल्या नव्हत्या. मात्र यापुढे नियमितपणे या स्पर्धा भरविण्यात येतील. यावर्षी चौतीस संघ या स्पर्धेत सहभागी झाले असले तरी पुढील वर्षी ही संख्या चाळीसच्या वर जाईल, कारखान्यातील खेळाडूंना आपल्या मधील कौशल्य दाखविता यावे यासाठी या स्पर्धेचे आयोजन केले आहे असे या वेळी श्री. संभाजी पाठारे यांनी यावेळेस बोलताना व्यक्त केला.

शुभारंभ प्रसंगी संभाजी पाठारे यांच्या समवेत एमएमएचे एचआर मॅनेजर निखिल भोसले, ओलॉनचे एचआर मॅनेजर प्रशांत म्हामुणकर, काळीज खरवली ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य म्हामुणकर ,अमोल म्हस्के, मुराद कुडपकर, विजय मांडे आणि एमएमए क्रीडा समितीचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!