तालुका
श्री क्षेत्र रामदास पठार येथे कोट्यावधी रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : दि १५ रोजी महाड मधील शिवथरघळ परिसरातील रामदास पठार जल जीवन मिशन अंतर्गत १ कोटी ११ लक्ष ७६ हजार रुपये मंजूर असलेल्या कामाचा भूमिपूजन शुभारंभ तसेच शिव समर्थ स्मारक उभारणे २५ लक्ष रामदास पठार येथील रस्ते १० लक्ष रुपये तलावाचे बांधकाम व सुशोभीकरण १ कोटी रुपये तसेच तलावाकडे जाणारा रस्ता १ कोटी रुपये इत्यादी विविध कामांचा शुभारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी गुरुवर्य अरविंदनाथ महाराज, माजी सभापती सपना मालुसरे आणि या भागातील शिवसेना युवा सेनेचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी उपस्थितीत होते.



