तालुका

प्रसोल कंपनी बंद न झाल्यास आंदोलन – मनसेचा इशारा

सचिन चांदोरकर – शहर प्रतिनिधी महाड

महाड दि. 23 महाड औद्योगिक वसाहतीमधील प्रसोल केमिकल्स हा कारखाना त्वरीत बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. ही कंपनी बंद न झाल्यास १ जानेवारी रोजी या कंपनीवर महामोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष चेतन उतेकर यांनी या मागणीचे निवेदन आज प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागिय अधिकारी श्रीमती इंदिरा गायकवाड यांना दिले. यावेळी दीपक चव्हाण, अभिजित पोटे, प्रमोद उतेकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

या कंपनीत सातत्याने अपघात होत असतात. वायुगळती होत असते. त्यात एका कामगाराला आपले प्राणदेखील गमवावे लागले आहे. मात्र त्यानंतरही थातूरमातूर कारवाया करुन ही कंपनी बंद असल्याचे भासविले जात आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाने ही जीवघेणी कंपनी तातडीने बंद करण्याचे निर्देश एमआयडीसीला द्यावेत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

जर ही कारवाई झाली नाही तर १ जानेवारी रोजी या कंपनीवर महामोर्चा काढून धरणे धरण्यात येईल असा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!