कोकरे गावाचा आमदार भरत शेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : महाड विधानसभा मतदारसंघ नाते विभागातील काँग्रेस पक्षांमधील कोकरे ग्रामस्थ आणि महिला भगिनींनी लोकप्रिय कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले आणि शिवसेना करत असलेल्या विकास कामांना भुरळून सर्वांनी एकमताने शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला.
नारायण बुवा रांजनकर, तुकाराम पवार, निवृत्ती रामचंद्र पवार, एकनाथ मोरे, उपसरपंच नंदू नामदेव गोठल, पांडूरंग बूर्टे, राकेश दिलीप पवार, वसंत रांजणकर, कीसन पवार, विजय बटावले, जितू गोविंद पवार, राकी गोठल, दिनेश पवार, गणपत पवार, सचिन रांजणकर, रोषन दाभेकर, सूहास रांजणकर, आकाश पवार, संदीप भद्रीके, अमोल बूर्टे, सूरज मोरे, पांडु काशिराम रांजणकर, संदीप पवार, पप्पू वसंत पवार, अनंत हीर्डेकर, सनी काटकर, सुदाम पवार, विठ्ठल रांजणकर, अल्पेश रांजनकर, राजेश पवार, अमोल बुर्टे, महेश पवार, अनंत पवार यांच्या समवेत शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.
या वेळी सुरेश महाडीक तालुका प्रमुख, एकनाथ सुकूम महाड तालुका सहसंपर्कप्रमुख, गणेश खाबे, अनिल पवार, नितीन घाणेकर, नंदु गोठल, राजेश सुकूम, राजू रिंगे, नारायण जगताप तसेच या भागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी उपस्थित होते.



