तालुका
अहिल्याबाई होळकर समाज मंदिरामधील अंगणवाडीची अपूर्ण कामे म.न.से च्या पाठपुराव्यामुळे पूर्ण
सचिन चांदोरकर – उपजिल्हा प्रतिनिधी रायगड
महाड : अहिल्याबाई होळकर समाज मंदिरामध्ये अंगणवाडी भरत असते, पण त्याला अंगणवाडीमध्ये कोणतीही सोयी सुविधा तेथे उपलब्ध नाहीत, तेथे शिक्षण घेत असलेले विध्यार्थी व शिक्षक यांना गैरसोईचा दररोज सामना करावा लागतो, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड मधील प्रतिनिधी यांच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा महाड शहर उपाध्यक्ष दिपक चव्हाण व पदाधिकारी यांनी प्रत्येक्ष पाहणी केली, विध्यार्थी व शिक्षक यान करीता लवकरात लवकर मुतारी व शौचालय याची सोय या करीता सातत्याने प्रशासन पाठपुरावा केला आणि त्याला यश मिळाले.

प्रशासन याने याची दखल घेऊन उर्वरित सर्व कामे पूर्ण केली, यावेळी शिक्षकांनी व पालकांनी प्रशासनाचे व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाड मधील प्रतिनिधी यांचे आभार मानले.



