8 महिला 03 पुरुष असे 11 श्रीसदस्य उष्माघातामुळे मृत्यू वेदनादायी तर 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले
राज्य शासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत / श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत करणार
सुरज पुरारकर – तालुका प्रतिनिधी तळा
खारघर, नवी मुंबई, जिल्हा रायगड येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला.
या सोहळ्याच्या समारोपानंतर काही श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाला. दुर्दैवाने यामुळे 8 महिला व तीन पुरुष असे एकूण 11 श्रीसदस्य मृत्यमुखी पडले असून 20 व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण 24 व्यक्तींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले आहे.
मृत पावलेल्या पैकी 8 महिला व 3 पुरुष असे एकूण 11 शव उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आले असून त्यांची नावे महेश नारायण गायकर वय वर्ष 42 वडाळा मुंबई (मूळ गाव म्हसळा मेहंदडी), जयश्री जगन्नाथ पाटील वय वर्ष 54 म्हसळा रायगड, मंजुषा कृष्णा भोंबंडे वय 51गिरगाव मुंबई (मुळगाव श्रीवर्धन), स्वप्निल सदाशिव केणी वय 30 शिरसाटबामन पाडा विरार, तुळशीराम भाऊ वांगड वय 58 जव्हार पालघर, श्रीमती कलावती सिद्धराम वायचळ वय 46 वर्ष सोलापूर, श्रीमती भीमा कृष्णा साळवी 58 वर्ष कळवा ठाणे, श्रीमती सविता संजय पवार 42 वर्ष मुंबई, श्रीमती पुष्पा मदन गायकर वय 64 वर्ष कळवा ठाणे, श्रीमती वंदना जगन्नाथ पाटील वय 62 वर्ष राहणार करंजाडे आणि एक अनोळखी महिला वय 50 ते 55 वर्ष असे एकूण 11 मृतदेह पैकी दहा मृतदेह वारसाच्या ताब्यात देण्यात आले असून एक मृतदेह बेवारस असून महिलेचा आहे वारसाचा शोध चालू आहे.



