तळा तालुक्यातील साईराज लिमकर, विशाल घाडगे आणि स्मिता नाक्ती यांची रायगड पोलीस दलात निवड
सुरज पुरारकर तालुका प्रतिनिधी तळा
तळा – तळा तालुक्यातील तिघांची महाराष्ट्र राज्य पोलीस भरती परीक्षेत निवड करण्यात आली आहे, २०२१ च्या पोलीस भरतीमध्ये साईराज जयंत लिमकर रा. तळा तालुका, विशाल विठोबा घाडगे रा. रोवळा आणि स्मिता सचिन नाक्ती रा. गिरणे या तिघांनी यश संपादन केले आहे. पोलिस भरतीचे अर्ज भरल्यापासून या तिघांनी दिवस-रात्र अतिशय कठोर परिश्रम घेतले. हलाखीच्या परिस्थितीतही मनात असलेली जिद्द व मेहनतीच्या जोरावर ते या स्पर्धेला सामोरे गेले.
यातील साईराज लिमकर याने मैदानी परीक्षेत ५० पैकी ४५ तर लेखी परीक्षेत १०० पैकी ९३ गुण मिळवले, विशाल घाडगे याने मैदानी परीक्षेत ४१ तर लेखी परीक्षेत ८२ गुण मिळवले आणि स्मिता नाक्ती हिने मैदानी परीक्षेत ४५ तर लेखी परीक्षेत ७३ गुण मिळवून उत्तम यश संपादन केले.
या तिघांनी मिळवलेल्या यशाबद्दल तालुक्यातील सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



