शहर

महाड एम आय डी सी कंपन्यांनमधील अकुंशल स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळण्यासाठी मनोज काळीजकर यांनी अधिकाऱ्यांना दिले निवेदन

आमदार भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली कंपनीतील अधिकाऱ्यांना त्यासाठी निवेदन आले देण्यात

स्वप्नील ढवण – उपसंपादक

ॲस्टेक लाईफ सायन्स आणि ब्लू जेट कंपनीमधील अकुंशल व कुशल स्थानिक कामगारांना प्राधान्य मिळण्यासाठी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली कंपनीतील अधिकाऱ्यांना आज रा. जि. प सदस्य श्री. मनोज काळीजकर यांनी निवेदन दिले व अधिकाऱ्यांनबरोबर चर्चा केली.

कंपनीत कामांकरीता अनेक कामगारांची गरज असते, त्याकरीता स्थानिक कामगारांना प्राधान्याने घेण्यात यावेत, येथील स्थानिक लोकांनी आपल्या जागा जमिनी औद्योगिक वसाहत उभारण्याकरिता कमी मोबदल्यात दिल्या असून त्यांना उदरनिर्वाहासाठी इतर साधणनाही, ज्यांचे शिक्षण १० ते १२ वी आहे त्यांना रोजगाराची आवश्यकता आहे, कंपन्यांकडून त्यांना रोजगार उपलब्ध होत नाही तसेच कंपनीत काही स्थानिक अकुंशल कामगार गेल्या काही वर्षापासून काम करीत आहेत परंतू त्यांना कंपनीने आजपर्यंत कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये समाविष्ट करून घेतलेले नाही, या निवेदनाचा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांभिर्याने विचार करावा हि बाब अतिशय गंभीरअसून स्थानिक कामगारांना रोजगार उपलब्ध न झाल्यास तसेच कंपनीच्या व्यवस्थापनामध्ये समाविष्ट न केल्यास स्थानिक लोकांच्या मोठया रोषास सामोरे जावून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो व त्याची संपूर्ण जबाबदारी ही आपल्या कंपनीच्या व्यवस्थापनेवर असेल, असे रा. जि. प सदस्य श्री. मनोज काळीजकर यांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बोलताना सांगितले.

यावेळी राजिप सदस्य श्री. मनोज काळीजकर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!