तालुका

मौजे कुंभेवाडी ते कुंभे धरण रस्त्याचा उद्घाटन समारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते संपन्न

७५ वर्ष्याच्या प्रतीक्षा नंतर अखेर रस्ता पूर्ण, कुंभे ग्रामस्थ महिला भगिनी आणि मुलांनी केली दिवाळी साजरी

 

सचिन चांदोरकर – जिल्हा प्रतिनिधी महाड

निजामपूर : निजामपूर विभागातील मौजे कुंभेवाडी ते कुंभे धरण रस्त्याचा उद्घाटन समारंभ आमदार भरतशेठ गोगावले यांच्या शुभ हस्ते पार पडला.

कुंभे या गावाला रस्त्यासाठी अखेर ७५ वर्ष वाट पाहावी लागली, आज आपल्या देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाली आहेत, तरीही गावामध्ये दळणवळणासाठी खुप पायपीट करावी लागत होती, रस्ता नसल्या कारणाने खूप संकटाना गावाकऱ्यांना सामोरे जावे लागले, आमदार भरतशेठ गोगावले यांच्या अथक प्रयत्नाने रस्ता अखेर पूर्ण झाला. कुंभे ग्रामस्थ, महिला भगिनी, तरुण वर्ग आणि वृद्धांनी मानले गोगावले यांचे आभार मानले, ७५ वर्षांनंतर गावामध्ये रस्ता आला आला आहे, आपणास कधीही आम्ही विसरणार नाही असे गावाकऱ्यांनी सांगितले.

यावेळी कुंभे ग्रामस्थ, महिला भगिनी, तरुण वर्ग यांनी फटाक्यांची आतष बाजी करत, वाजत गाजत, जयघोष करत संपूर्ण वातावरण भगवेमय केले. कुंभे ग्रामस्थ महिला भगिनी आणि मुलांनी जणु दिवाळी साजरी केली.

या भागातील जनतेने अनेक वेळा निवडून देऊन मंत्रीपदावर विराजमान होऊन देखील या कुंभे गावाला न्याय मिळाला नव्हता तो न्याय आमदार भरतशेठ गोगावले यांनी मिळवून दिला.

वृद्धांच्या तसेच तरुणांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून आमदार भरतशेठ गोगावले यांना त्यांच्या कामाचे समाधान वाटले, कुंभे धरणाचे काम देखील लवकरच मार्गी लावणार असल्याचे सांगितले.

या वेळी जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, संपर्कप्रमुख, विभाग प्रमुख, या भागातील शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!