प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची महाड तालुका कार्यकारिणी जाहीर
श्रीकांत गायकवाड – तालुका प्रतिनिधी महाड
रायगड महाड: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र या संघटनेची महाड तालुक्याची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे यांच्या अध्यक्षतेखाली पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी .टी. आंबेगावे सर यांच्या मार्गदर्शनाखाली, कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे व कोकण युवा जनसंपर्क प्रमुख सागर पवार यांच्या उपस्थितीत महाड तालुक्याची नव्याने कार्यकारणी तयार करण्यात आली.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या महाड तालुकाध्यक्ष पदी किशोर किर्वे, तालुका उपाध्यक्ष संजय पवार, महाड ता. सचिव स्वप्नील ढवण, सहसचिव श्रीकांत गायकवाड, महाड ता. कार्याध्यक्ष इस्माईल मापकर, महाड ता. खजिनदार रेश्मा माने, महाड ता. संघटक संदेश चौधरी, महाड ता. सहसंघटक राकेश देशमुख, महाड ता. सदस्य प्रतीक पलंगे, यांच्या सह पत्रकार विवेक चाफेकर व अभिजीत ढाणीपकर उपस्थित होते.
यावेळी नवनिर्वाचित महाड तालुकाध्यक्ष किशोर किर्वे म्हणाले की, वेळप्रसंगी पत्रकारावर हल्ला करणाऱ्याला माफ करणार नाही. या संघामध्ये सहभागी झालेल्या पत्रकारांना घाबरायचे कारण नाही संघटना वाढीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवावे, आपल्या लेखणीचा योग्यवापर करून गोर गरिबांच्या भल्यासाठी निर्भीड बातम्या लिहावे. कोणालाही न घाबरता लिखाण करत जा आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले. कोकण विभाग उपाध्यक्ष योगेश भामरे व कोकण युवा जनसंपर्क प्रमुख सागर पवार यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.



