न्यूझीलंड येथे चार गोल्ड मेडल विजेत्या प्रतीक्षा गायकवाड शिगवण यांचा आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते सन्मान
सचिन चांदोरकर – तालुका प्रतिनिधी महाड
महाड : न्यूझीलंड येथे भारताच्या वतीने कॉमनवेल्थ स्पर्धेत वेटलिफ्टिंग पावर लिफ्टिंग स्पर्धेत चार गोल्ड मेडल मिळवून विजेत्या ठरलेल्या प्रतीक्षा गायकवाड यांचा महाडकरांच्या वतीने आणि भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकात सन्मान करण्यात आला.
यावेळी आमदार भरतशेठ गोगावले यांनी प्रतीक्षासह तिच्या, आई-वडिलांचा देखील सन्मान केला. यावेळी आपल्या मार्गदर्शनात गोगावले यांनी पुढे सांगितले की प्रतिक्षा हिने, न्युझीलंड येथे चार गोल्ड मेडल मिळवून भारताची मान उंचावण्याचे काम तर केले, आहेच पण रायगड जिल्ह्याचे तसेच महाड तालुक्याची मान उंचावल्याबद्दल आमदार गोगावले यांनी प्रतीक्षा हिचे विशेष आभार मानले.
यावेळी गोगावले यांनी सांगितले की, प्रतीक्षा हिला परदेशात जाण्यासाठी देखील आपण वेळोवेळी मदत तर करत आहोतच, पण चार गोल्ड मिळून विजेता ठरलेल्या प्रतीक्षा ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून देखील सन्मानित करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री महोदयांनी त्वरित रोख दोन लाख रुपये बक्षीस म्हणून सहकार्य देखील केले आहे. तसेच आम्ही देखील वेळोवेळी लागेल ते सहकारी प्रतीक्षा ला करत आहोत. आणि इथून पुढेही करणार असल्याचे, यावेळी गोगावले यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी नगराध्यक्ष सुनील कविस्कर, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळीजकर तसेच शिवसेना युवा सेनेचे आजी-माजी पदाधिकारी आणि इतर राजकीय पक्षाचे नेते मंडळी इत्यादी उपस्थित होते.



