हॉटेलमध्ये पिण्यायोग्य पाणी मोफत द्या, समोर लगेच पाण्याच्या बाटल्या ठेवू नका; तुकाराम मुंढेंचा आदेश

मुंबई शहर प्रतिनिधी ( अक्षय जाधव )
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीनं राज्यात ‘सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र ही मोहीम सुरू करण्यात आली त्या माध्यमातूनग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जाणार आहे. त्यामुळे नियमांचं उल्लंघन करणाऱ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, धाबे मालकांनासोडणार नाही, असा इशारा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. एफडीएने आखून दिलेल्या नियमानुसार या हॉटेल्सचे किचन असावे, त्यामध्ये अस्वच्छता दिसल्यास कुणालाही सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
आरोग्य विषयी नियमांचं पालन करताना काही नियम ठरलेले आहेत, त्या नियमांचं सर्वांनी पालन करणं बंधनकारक असावं. जरनियमांचं पालन केलं तर घाबरण्याचं कारण नाही. नियमांचं पालन केलं नाही तर तुम्हाला कोणीच वाचवू शकणार नाही, असा कडकइशारा तुकाराम मुंढे यांनी दिला.
हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जाते अशा किचनमध्ये स्वच्छतेचेनियम पाळणे आवश्यक असल्याचं तुकाराम मुंढेंनी सांगितलं.
एफडीएच्या नियमांनुसार हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, इटरीज, धाबे, मिठाईवाले, बेकऱ्या आणि ज्या ठिकाणी अन्नावर प्रक्रिया केली जातेत्यांचे किचन म्हणजे स्वयंपाक घर कसं असावं, त्या संबंधित नियम काय आहेत याची माहिती तुकाराम मुंढे यांनी दिली.
अनेक हॉटेल्स किंवा रेस्टॉरंट्समध्ये ग्राहक गेल्यानंतर त्याच्या समोर बाटलीबंद पाणी आणून ठेवलं जातं. तसं न करता ग्राहकांना शुद्धआणि सुरक्षित पिण्याचं पाणी हे मोफत उपलब्ध करून द्या, असे आदेश तुकाराम मुंढे यांनी दिले. तसा बोर्ड समोर लावणे आवश्यकआहे, असंही ते म्हणाले. जर एखाद्या ग्राहकाला बाटलीबंद पाणी हवं असेल, त्याने मागणी केली तरच त्याला ते देण्यात यावं असंतुकाराम मुंढे यांनी स्पष्ट केलं.



