श्रीवर्धन नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश
शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर पक्ष प्रवेश संपन्न

श्रीवर्धन शहर प्रतिनिधी ( अनिकेत मोहित )
ठाणे : 23 जून मंगळवार शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीवर्धन तालुक्यातील उबाठागटाचे नगराध्यक्ष ॲड. अतुल चौगुले यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी दक्षिण रायगडचे माजी जिल्हाप्रमुख विजयराज खुळे यांनीही शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
त्याच्याबरोबर विक्रांत राऊत, साकार जाधव, प्रीतम श्रीवर्धनकर, लखन भाटकर, पायल भाटकर, मयुरेश मयेकर, प्रतीक पालवे, नियती जाधव आणि असंख्य कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश केला.
माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ईशान्य मुंबई जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ, उपाध्यक्ष अजितकुमारपिसाळ, माजी नगरसेविका भारती पिसाळ, उपाध्यक्ष हनुमंत ठाकूर, हिराजी निंबाळकर, शर्मिला पवार, वॉर्ड अध्यक्ष ज्योती पुजारी, कल्याणी बोंद्रे, युवक अध्यक्ष अनिल पुजारी, जितेंद्र खोत, अल्पसंख्यांक विभाग अध्यक्ष ऑस्कर किणी यांनीही हाती भगवा झेंडा घेतशिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला.
हा पक्ष सोहळा शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थिती आणि राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठगोगावले, माजी महापौर दत्ता दळवी, उपनेत्या सुवर्णा करंजे तसेच शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थितीत संपन्न झाला.
या सर्वांचे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.