श्रीवर्धन शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती धुमधडाक्यात साजरी
जितेंद्र माळी – तालुका प्रतिनिधी श्रीवर्धन
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणूनही ओळखले जाते. अशा महामानवाचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या ठिकाणी झाला. सुप्रसिद्ध भारतीय न्यायशास्त्रज्ञ, महान राजकारणी, तत्त्वज्ञ, विचारवंत, मानववंशशास्त्रज्ञ, इतिहासकार आणि अर्थशास्त्रज्ञ तसेच संसदपट्टू म्हणून ओळखले जाते, बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी, समाजाच्या कल्याणासाठी आयुष्यभर संघर्ष करणारे स्वतःला वाहून घेणारे ते होते, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, असा गुरुमंत्रबहुजन समाजाला दिला, तळागाळातील सर्व सामान्य माणूस सर्व शक्तिनिशी जागा केला, त्याला आत्मसन्मान, स्वाभिमान, अस्मिता वसामर्थ्याची जाणीव करून दिली, मानसिक गुलामगिरीतून मुक्त केले, हक्काने जगण्याचे शिकवले, त्यासाठी संघर्षाचे सत्याग्रह करून समता व न्याय समाजात निर्माण केले.
सर्वांना समान न्याय, हक्क अधिकार, समता, स्वतंत्र व बंधुत्वाच्या विचारांची प्रेरणा देऊन देशाला संवैधानिक दिशा देणारे महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती श्रीवर्धन शहरात साजरी करण्यात आली, गेल्या दोन वर्षात जगभरात कोरोना महामारीने थैमान मांडला होता, या भयंकर विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन सारख्या परिस्थितीमुळे सगळ्याच सण उत्सवांवर विरजण पडले होते, गेल्या दोन वर्षात १४ एप्रिल अर्थात महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरच्या घरीच साजरी करण्यात आली होती, दरवर्षी धुमधडाक्यात सार्वजनिकरित्या साजऱ्या होणाऱ्या या वार्षिक आनंदोत्सवावर कोरोनाचे सावट आलं होतं, मात्र या वर्षी कोरोनाचे संकट ओसरलं असल्यानं तब्बल दोन वर्षानंतर हि यंदाची भीम जयंती पहिल्या सारखीच श्रीवर्धन शहरात धुमधडाक्यात साजरी करण्यात आली.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याकरिता श्रीवर्धन नगर परिषदेतील कर्मचारीवृंद, श्रीवर्धन तहसिल कार्यालयाचे नायब तहसिलदार भुरखे, तलाठी अर्जुन भगत, आगार व्यवस्थापक तेजस गायकवाड, प्रदीप विचारे, औ. प्र.स. चे उपप्राचार्य कांबळे, अंकुश सुर्यवंशी, प्रितम श्रीवर्धनकर, जुनेद दुस्ते, राजेश चव्हाण, संतोष पगारे, रावसाहेब चित्ते, विनोद झरे, तुकाराम भालेराव, संजय झरे, प्रविण वाघमारे तसेच रा.प. महामंडळाचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे धम्म विधी बौद्धाचार्य संदीपजाधव यांनी पार पाडले, या कार्यक्रमाचे सुत्र संचालन राहुल गायकवाड यांनी प्रभावी पणे पार पाडले.




