महाड महापुर निवारण समितीच्या प्रयत्नांना यश
काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन प्रांताधिकारी प्रतिमा पुदलबाड यांनी दिले
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
राष्ट्रीय महामार्गाचे काम त्वरेने होण्याकरिता महाडपुर निवारण समितीने १५ एप्रिल २०२२ रोजी रास्ता रोको आंदोलनाची हाक समस्त ३२ गावांतील पूरग्रस्त जनतेला दिली होती, पण तत्पूर्वीच प्रशासन प्रांताधिकारी प्रतिमा पुदलबाड यांनी पुढाकार घेतला आणि राष्ट्रीय महामार्गाचे असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर मेश्राम मॅडम यांनी त्यास योग्य तो प्रतिसाद देऊन पूल पाडण्याच्या कामाला सुरुवात केली, सध्या तेथे एक पोकलेन लावण्यात आला आहे व तेथे ब्रेकर हि लावण्यात येणार आहे, लवकरच डेब्रिज काढल्यावर दोन्ही बाजूने ४–४ ब्रेकर लावून हे पूल पाडण्याचे काम वीस–बावीस दिवसात पूर्ण करणार असल्याचे सांगितले, दर आठ दिवसांनी झालेल्या कामाचा आढावा घेण्याकरिता राष्ट्रीय महामार्ग आणि पूर निवारण समिती यांचे एकत्रित बैठक होणार आहे, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होईल असे आश्वासन प्रांताधिकारी प्रतिमा पुदलबाड यांनी राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने दिली आहे.
डोंगरातून येणारे पाणी वाहून जाण्याकरिता पूर्वी नैसर्गिक वहाळ होती, ती राष्ट्रीय महामार्गाच्या कामात बंद झाली, त्या पावसाच्या पाण्याचा निचरा होण्याकरिता नांगलवाडी येथून नदीपर्यंत नाला करण्याचे काम हे सतत पाठपुरावा करूनही होत नव्हते, ते काम राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी मेश्राम मॅडम यांनी करण्याचे मान्य केले.
सोमवार दिनांक १८ एप्रिल रोजी महाड एमआयडीसी अधिकाऱ्यांबरोबर नाल्याचे रेखांकन करून लगेच ते काम करण्यात येईल असे सांगितले.
नडगावच्या अलिकडे एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्याच्या डाव्या बाजूस डोंगर कटिंग केला आहे, तेथून छोटे–मोठे दगड हे सतत रस्त्यावर पडत असतात, याने येणाऱ्या जाणाऱ्या दोन चाकी वाहन चालकांना इजा पोचू शकते तेव्हा ते देखील एल अँड टी अधिकाऱ्यांनीस्वच्छ, साफसूफ करून तेथील दगड कपची वगैरे साफ करण्याचे मान्य केले, पुढील आठ दिवसात त्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.
नवीन बांधलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूला abatement केले आहे तिथे Culvert टाकण्याची आवश्यकता आहे असे पूरनिवारण समितीचे ठाम म्हणणे आहे.
त्याबाबतचा अहवाल डॉ. पोरे हे सादर करणार आहेत, तो अहवाल सादर करत असताना तत्पूर्वी महाडपुर निवारण समिती बरोबर वीसतारखेला बैठक आयोजित केली जाईल, त्यामध्ये पूर निवारण समितीचे म्हणणे ऐकून योग्य तो सकारात्मक बदल करून मगच तोअहवाल राष्ट्रीय महामार्ग आणि शासन यांना सादर केला जाईल असे प्रांताधिकारी प्रतिमा पुदलबाड यांनी कबूल केले आहे.
महाडपुर निवारण समितीने राष्ट्रीय महामार्ग बाबत आपल्या चार मागण्या प्रशासनाला दिल्या होत्या, त्यांची योग्य ती दखल घेत सगळ्या मागण्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाला, दोन कामे तातडीने सुरू केले आहेत.
ज्या मागण्यांकरिता रास्ता रोको आंदोलन करायचं होते त्याची योग्य ती दखल घेतल्यामुळे सर्वानुमते स्थगित करण्यात आले आहे.
प्रशासन, प्रांताधिकारी प्रतिमा पुदलबाड, तहसीलदार काशीद, डी वाय एस पी तांबे, राष्ट्रीय महामार्ग अधिकारी मेश्राम मॅडम सर्वांनी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यात आले.



