शहर

महाड येथे ‘युनिहेल्प’च्या कर्जमुक्ती अभियान मदत प्रणाली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन

उपस्थितांना मिळाले आर्थिक सक्षमीकरणाचे मार्गदर्शन

 

प्रदीप सोंडकर महाड शहर प्रतिनिधी 

महाड : सर्वसामान्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी आणि कर्जमुक्तीच्या दिशेने ठोस पाऊल उचलण्याच्या उद्देशाने रविवारी, २० सप्टेंबर २०२६ रोजी महाड येथील नवे नगर स्थित प्राइड इंडिया हॉल (सरकारी दवाखान्याजवळ) येथे एका विशेष कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. “कर्जमुक्ती अभियान मदत प्रणाली (Unihelp.in)” या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम पार पडला.

“संकल्पनेच्या आधारे प्रगतीकडे वाटचाल – आर्थिक स्वातंत्र्याचे नवीन पर्व” या ब्रीदवाक्याखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांना कर्जमुक्त होण्यासाठी योग्य दिशा दाखवणे, हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

तज्ज्ञ मार्गदर्शकांचे लाभले मार्गदर्शन

या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. किरण थोरात सर (संस्थापक अध्यक्ष, युनिहेल्प) आणि श्री. सोमनाथ पोपट गायकवाड (मुख्य मार्गदर्शक) उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना कर्जमुक्ती अभियानाचे विविध पैलू, आर्थिक नियोजन आणि युनिहेल्प प्रणालीचा वापर करून आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे, याबद्दल अत्यंत सोप्या व प्रभावी भाषेत मार्गदर्शन केले.

संयोजक व उपस्थितांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन सुदाम बाबु शिंदे व संदिप बाबाजी सकपाळ यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

कार्यक्रमादरम्यान अनेक मान्यवर, प्रमुख पाहुणे, युनिहेल्प परिवारातील सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या उपक्रमाचे मनापासून स्वागत केले असून, अशा प्रकारच्या मार्गदर्शनामुळे नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता आणि प्रगतीची एक नवीन उमेद निर्माण होईल, असा विश्वास वक्त्यांनी व्यक्त केला.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!