रा. जि. प. उच्च प्राथमिक शाळा- गांधारपाले महाड आभासी शाळा उदघाटन सोहळा संपन्न
उदघाटन सोहळा डॉ. सुनिता चांदोरकर गट शिक्षण अधिकारी पं. स. महाड यांच्या हस्ते संपन्न
सचिन चांदोरकर – ग्रामीण प्रतिनिधी महाड
रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा-गांधारपाले महाड या शाळेचा आभासी शाळा उदघाटन सोहळा नुकताच दि 22 एप्रिल रोजी डॉ. सुनिता चांदोरकर गट शिक्षण अधिकारी पं. स. महाड यांच्या हस्ते संपन्न झाला.

रायगड जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गांधारपाले ही करंजखोल केंद्रातील शाळा असून येथे सर्वसाधारण विद्यार्थ्यां समवेत वंचित घटकातील मुले ही शिक्षण घेत आहेत. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार शिक्षण मिळावे, त्याच प्रमाणे तंत्रज्ञानाच्या युगात आपल्या विद्यार्थ्याने स्वतःची शेक्षणीक प्रगती साधावी आणि त्याचा सर्वांगीण विकास व्हावा या मुख्य हेतूने या शाळेतील पदवीधर शिक्षक प्रकाश धर्मा धाटावकर यांनी अविरत परिश्रम करून गांधारपाले शाळा संपूर्ण महाड तालुक्यामध्ये पहिली आभासी शाळा स्थापन केली आहे. या सुविधेमुळे या शाळेतील विद्यार्थी आता आपल्या शाळेत बसुन संपूर्ण जगाशी जोडले जाणार आहेत, त्याच प्रमाणे इतर ठिकाणांवरील मार्गदर्शन विद्यार्थ्यांना इंटरनेट द्वारे पहावयास मिळणार आहे.
या साठी आर्थिक सहाय्य करणाऱ्या निरजा नितीन कुद्रिमोती प्रकल्प अधिकारी एन आर इस्पात अँड पावर प्रायव्हेट लमिटेड, छत्तीसगड यांच्या अनमोल अशा आर्थिक साहाय्याने व प्रकाश धाटावकर सर यांच्या अविरत परिश्रमाने गांधारपाले शाळा येथील विद्यार्थ्यांसाठी सर्व सोयींनी सुसज्ज झाली आहे, विशेष आणि कौतुकास्पद अशी कामगिरी आपल्या संपूर्ण सेवा कालावधी मध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी अविरत परिश्रम घेणाऱ्या धाटावकर दाम्पत्यांना पंचायत समिती महाड व शाळेच्या वतीने सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे, खरोखरच या पति पत्नीचे संपूर्ण महाड तालुक्यामध्ये कौतुक केले जात आहे.
उदघाटन प्रसंगी शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक विभाग नीरजा कुद्रीमोती मॅडम, पनवेल डायटचे अधीव्याख्याते उत्तम तरे सर प्राचार्य बी. एड. कॉलेज नेरळ, विविध क्षेत्रातील मान्यवर, अधिकारी वर्ग या सर्वांनी सदर लाईव्ह कार्यक्रमास जॉईन होऊन मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत व कौतुक देखील केले आहे, या वेळी सदानंद मांडवकर माजी सभापती पं. स. महाड, मा. डॉ. सुनिता चांदोरकर गटशिक्षणाधिकारी, स्नेहा विरकर केंद्रप्रमुख, रीहाना सोलकर सरपंच ग्रामपंचायत गांधारपाले, समिता बाईत उपसरपंच, सहदेव उतेकर अध्यक्ष शा. व्य. समिति, सुभाष चव्हाण शिक्षण प्रेमी, नामदेव पवार स्थानिक स्वराज्य संस्था प्रतिनिधी, मन्सूर ताज प्रतिष्ठित नागरिक, प्रणिता माळवदे, मुख्याध्यापक, बनसोडे सर तसेच पालक वर्ग, ग्रामस्थ मंडळ, तरुण मंडळ व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील पदवीधर शिक्षक श्रप्रकाश धाटावकर यांनी केले तर उपशिक्षिका किशोरी पाथरे यांनी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.



